घरफोडी होऊ नये म्हणून गावात सभा घेऊन जनजागृती करावी Best 1 to 32 मुद्दे

By | July 4, 2023

पोलीस पाटील म्हणून काम करतांना घरफोडी सारखे अनेक प्रकार आपल्या समोर येत असतात तर त्याच्यात काय उपाययोजना आपण आपल्या गावात करू शकतो ते पुढे दिले आहे. चोरीच्या दोषीविरुद्ध विविध कलमे (कलम) लागू केली जाऊ शकतात. तर या कालमांविषयी सविस्तर माहिती IPC SECTION MARATHI या मध्ये दिलेली आहेत.

घरफोडी

घरफोडी

घरफोडी विषयी काय जनजागृती करावी

१ ) शेजार धर्म , आपुलकीचे व सहकार्याचे संबंध ठेवावे
२ ) गल्लीत परोपकाराने वागावे .
३ ) आलेल्या संकटास . संघटनशक्तीने लढा द्यावा.
४ ) पोलीस + जनता = समन्वय साधणे
५ ) उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत बरेच लोक बाहेरगावी जातात . त्यावेळी शेजारच्यांना सांगून जा .
६ ) गावास जाण्यापूर्वी एक व्यक्ती तरी घरी ठेवा .
७ ) गुरखा , वॉचमन , पोलीस स्टेशन येथे सांगून जावे .
८ ) सर्व साहित्य तपासून घ्या . खिडक्या दारे बंद करा .
९ ) विद्युत उपकरणे बंद करावीत .
१० ) गॅस शेगडीचे बटन , सिलिंडरचे मेन बटन बंद करावे .
११ ) मोटार सायकल लॉक करा . फोरव्हिलरची आतून काच बंद करून , लॉक करावीत .
१२ ) घराच्या मागे – पुढे लाईट लावा . गल्लीत स्ट्रीट लाईट लावून घ्या . अंधाराचा गैरफायदा चोर घेणार नाही .
१३ ) बाहेरून कोणी कॉल बेल वाजविली किंवा दरवाजा ठोठावला तर अनावधानाने दार उघडू नका .
१४ ) खात्री करूनच दार उघडा . लाकडी दरवाजास लिव्हर लॉक लावा . लोखंडीजाळीचे दार लावा .
१५ ) मौल्यवान दागिने , कॅश घरात न ठेवता बँकेत ठेवा . दागिन्यांचे फोटो काढून ठेवा . नोटांच्या सिरिज नंबरची नोंद ठेवावी .
१६ ) उन्हाळ्यात रात्री गच्चीवर झोपतात . एकाने तरी खाली झोपावे .
१७ ) झोपण्यापूर्वी रात्री दरवाज्याजवळ मिरची पूड डबा ठेवा . कोपऱ्यात काठी शिट्टी ठेवा .
१८ ) उशीजवळ बॅटरी ठेवा . कुत्रे जोराने भुंकल्यास खात्री करा .
१ ९ ) भरपूर पाणी प्या . लघवीला उठाल . गस्त घालून बघा . मोठा आवाज येत असेल तर खात्री करा .
२० ) घटना घडली तर शेजारील लोकांना उठवा . उठविण्यास संबंधितांना फोन करा . पो . स्टेशनला फोन करा .
२१ ) एखादा इसम बेपत्ता झाल्यास संशयाप्रमाणे त्याचा शोध घ्यावा .
२२ ) हौसिंग सोसायटीत सायरन्सची व्यवस्था करावी . मी पोलीस आहे , असे सांगणाऱ्याचे नाव , पत्ता विचारा .
२३ ) आर्म लायसन्स प्राप्त करून , शस्त्र , हत्यारं ठेवू शकता .
२४ ) धुणं – भांडेवाली , नोकर – चाकर , भाडेकरी यांचे रेकॉर्ड पाहून , खात्री करून ठेवा .
२५ ) सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या आमिषाला बळी पडू नका .
२६ ) शेजारचे कोठे गेलेत ? असे विचारल्यास माहीत नाही असे सांगा प्रसाद दिला तर तो खाऊ नका .
२७ ) फोनला कॉलर आय.डी. आणि टेपरेकॉर्डर बसवावे . म्हणजे ब्लॅक कॉल टेप होतील .
२८ ) दुकानातून बँकेत जाण्याच्या वेळेत बदल करावा . मुलाने किंवा पित्याने आळीपाळीने भरणा करावा .
२ ९ ) अनोळखी इसमास घरात प्रवेश देऊ नका . साहेबांनी १ थैली रु .२०० / – मागितले आहेत , असे सांगितल्यास महिलांनी देऊ नयेत .
३० ) गल्लीतील काही दारू पिऊन स्त्रीला त्रास देत असतील तर महिला मंडळामार्फत पो . स्टेशनला फोन करा .
३१ ) ग्रामीण भागात घटनेप्रमाणे घरफोडी , चोरी किंवा इतर गुन्हे घडले तर पोलीस पाटलाची मदत घ्या .
३२ ) सुरक्षा रजिस्ट्रेशन संस्था येथून , साधी सुरक्षा आणि बंदूकधारी सुरक्षा मिळेल .

घरफोडी सारख्या गुण्यांमध्ये पुढील प्रमाणे काही शिक्षेच्या तरतुदी दिलेल्या आहेत.  खरे तर अशा गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांचा संदर्भ घेणे म्हत्वाचे आहे. त्या नुसारच गुंन्हा ठरवू शकू. सविस्तर माहितीसाठी IPC सेक्शन मराठी ला visit करा.

कलम ३७९ : चोरीसाठी शिक्षा. हे कलम चोरीच्या गुन्ह्याची व्याख्या आणि शिक्षा देते.

कलम 380: चोरीसाठी आगाऊ दंड. हे कलम मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तूंच्या चोरीला आगाऊ शिक्षा देते.

कलम ३८१ : लोहाराला चोरीची शिक्षा. जेव्हा चोरी वाहन, जमीन किंवा बागेशी संबंधित असेल तेव्हा या कलमात चोरीसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.

कलम 382: कमी प्रमाणात चोरीसाठी शिक्षा. हे कलम कमी प्रमाणातील वस्तूंच्या चोरीला शिक्षा देते.

ही फक्त काही IPC कलमे आहेत आणि चोरीसाठी आणखी अनेक कलमे आहेत जी गुन्हेगारांविरुद्ध शिक्षा देतात. कृपया स्थानिक कायदेशीर नियमांचे पालन करा आणि गुन्ह्याचा संदर्भ घ्या

One thought on “घरफोडी होऊ नये म्हणून गावात सभा घेऊन जनजागृती करावी Best 1 to 32 मुद्दे

  1. Pingback: महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा | Best MH Diversion of Property Act 1995

Comments are closed.