Police Patil Daptar पोलीस पाटलाचे दप्तर 5 नोंदवह्या Free माहिती

By | October 18, 2023

Police Patil Daptar

पोलीस पाटील हा शासनाचा गावातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे पोलिसांना किंवा शासनाला शासकीय कामात लागणारी मह्त्वाची माहिती अथवा पत्रके पुरवण्याचे काम Police patil पोलीस पाटलाचे आहे. त्यासाठी पोलीस पाटलाकडे पुढील प्रमाणे दप्तर असणे आवश्यक आहे.

Police patil daptar

police patil daptar

पोलीस पाटलाचे दप्तर

1. खबरी रिपोर्ट नोंदवही
2. मरणोत्तर चौकशी प्रतिवृत्त
3. बाहेरून आलेल्या प्रवाशांची नोंदवही
4. विजीट बुक
5. पोहोच मिळणे ( बेलीफ बुक )

Police Patil Daptar 1 खबरी रिपोर्ट नोंदवही

पोलीस पाटलाने वरीलपैकी दप्तर नोंदवह्या वेळोवेळी अपडेट करत राहायच्या आहेत, गावातील कोणतीही खबर असल्यास ती वेळोवेळी खबरी नोंदवही मध्ये नोंद करायची आहे. जेणे करून आपल्याला त्याची माहिती कधीही काढता येऊ शकते.

Police Patil Daptar 2 मरणोत्तर चौकशी प्रतिवृत्त

पोलीस पाटलाचे मरणोत्तर नोंदवही मध्ये कलम १३ नुसार काही गाइडलाईन दिलेल्या आहेत, त्यानुसार चौकशी रेपोर्ट व पंचनामा तयार करून ते संबंधित अधिकार्याकडे सादर करून, त्याची नोंद आपल्या मरणोत्तर चौकशी प्रतिवृत्त नोंदवही मध्ये घ्यायची आहे.

Police Patil Daptar 3 बाहेरून आलेल्या प्रवाशांची नोंदवही

पोलीस पाटलाने बाहेर गावाहून आलेले प्रवासी नोंद वही तयार करून त्यात त्यांची नोंद करावयाची आहे. नोंद करतांना ते कुठून व काय कामासाठी आलेले आहेत किती दिवसांसाठी आलेले आहेत व त्यांच्या बरोबर आजून किती लोक आलेले आहेत त्यांचे प्रूफ जसे आधार कार्ड मोबाईल नंबर याची नोंद घ्यायची आहे.

Police Patil Daptar 4 विजीट बुक

विजीट बुक मध्ये गावात येणारे पोलीस अधिकारी तसेचे शासकीय कर्मचारी यांची विजीट नोंदवायची असते, हि नोंद ते त्यांच्या कामानुसार नोंदवतात त्यांच्या अक्षरात. हि बुक अत्त्यंत महत्वाची आहे, कारण तुम्ही म्हणजे पोलीस पाटील गावात असल्याचा साबूत आहे, म्हणून पोलीस पाटलाची वेळोवेळी विजीट बुक वर नोंदी घेणे गरजेचे आहे.

पोलीस पाटलांच्या दप्तरामध्ये एक बेलीफ बुक आहे, पोहोत मिळणे, यांसारखे दप्तर पोलीस पाटलाकडे असणे आवश्यक आहे, पोलीस पाटील हा गाव पातळीवरील महत्वाचा व्यक्ती असल्यामुळे त्याचे दप्तराचेहि तेवढेच महत्व आहे.

आज ह्या लेखात पोलीस पाटीलाचे दप्तर याची माहिती आपण घेतली, यात काही जोड नोंदवायची असल्यास किंवा तुमच्या काही सूचना असल्यास आपण आम्हाला email द्वारे कळवू शकता

पोलीस पाटलाची माहिती 

 

POLICE PATIL DAKHLA 

 

One thought on “Police Patil Daptar पोलीस पाटलाचे दप्तर 5 नोंदवह्या Free माहिती

  1. Pingback: Police Patil dakhla कसा काढावा | पोलीस पाटलांचे विविध दाखले | 3 IMPORTANT दाखले

Comments are closed.