Act 1988 कलम ३ धार्मिक स्थळे दुरुपयोग प्रतिबंधक

By | August 19, 2024

मित्रांनो धार्मिक स्थळे दुरुपयोग प्रतिबंधक Act 1988 कलम ३ या कलमान्वये कोणतीही व्यक्ती धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करेल, जसे राजकीय कामासाठी, हत्यारे गुन्हेगारी कृत्यासाठी किंवा अजून कायद्याने प्रतिबंध केलेल्या कामासाठी करीत असेल तर ते धार्मिक स्थळे दुरुपयोग कायद्यामध्ये येते. हा गुन्हा करण्याराला कायदा १९८८ कलम ३ अन्वये गुन्हा समजला जातो.

Act 1988

Act 1988

या गुन्ह्यात पुढील मुद्याचा समावेश होतो Act 1988

पोलीस पाटील मित्रांनो आपण गाव पातळीवर काम करीत असतो त्यामुळे या कायद्याचा ज्ञान हि आपल्या कडे असणे आवश्यक आहे त्यामुळे मी ह्या लेखात कायदा १९८८ कलम ३ चा समावेश करून या कायद्याविषयी मी तुम्हाला आज या लेखात सांगणार आहे.

१) राजकीय हालचाली करिता Act 1988

मित्रांनो आज आपण पाहताच आहोत कि आपल्या राजकीय लोकं धर्माच्या नावाने राजकारण करत असतात व जाती जाती मध्ये फोड करून राजकारण करत आहे, अशा वेळेस गाव पातळीवर काम करत असतांना, आपण पोलीस पाटील म्हणून ह्या विषय कडे कशा पद्धतीने बघू. राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी धर्मालाही सोडलेले नाही म्हणून आज आपण पाहत आहोत कि राजकारणी धार्मिक स्थळांचा वापर सर्रास पने करतांना दिसतात काही लोकांनी तर देवच वाटून घेतलेले आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हालचालींकरीता त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घायची आहे.

२) गुन्हेगारांना आश्रय देणे करिता

धार्मिक स्थळांचा वापर गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी होऊ नये कारण आपण बघतो कि धर्मा च्या नावाखाली लोकं धार्मिक स्थळांचा गैर वापर करत असतात. देवाच्या नावाखाली मोठ मोठे गुन्हेगार अशा धार्मिक स्थळांचा वापर करतांना दिसतात ते लपण्यासाठी असो किंवा चुकीच्या मार्गातून कमवलेले धन लपवण्यासाठी कारण देवा जवळ आपण आस्थेच्या भावनेने बघतो व त्याचाच फायदा असे गुन्हेगार घेत असतात. आणि असे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

३ ) हत्यारे किंवा दारूगोडा साठविणे करिता Act 1988

धार्मिक स्थळांचा उपयोग काही गुन्हेगारी कृत्य करणारे लोकं त्याचा उपयोग हा आपल्या कामासाठी म्हणजे गुन्हेगारी कृत्य / काम करण्यासाठी करत असतात जसे दारूगोडा साठवणे किंवा हत्त्यारे लपवण्यासाठी करत असतात. असे कोणी करत असेल तर त्याचावर वेळीच बंधन घालणे गरजेचे आहे कारण त्यांच्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होऊ शकते. व आपला समाज ह्या मुळे खराब होऊ शकतो.

४ ) कोणत्याही कायद्याने प्रतिबंध केलेल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवणे करिता

वरील मटल्या प्रमाणे कायदा १९८८ कलम ३ अन्वये कायद्याने प्रतिबंध केलेल्या वस्तूंची साठवण करणे किंवा त्या वस्तू लपविण्यासाठी धार्मिक स्थळांचा उपयोग केल्यास वरील कायद्यान्वये त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो.

५ ) चुकीचे बांधकाम Act 1988

वरील कायद्यात धार्मिक स्थळांच्या अवती भवती कोणी जर पूर्व परवानगी न घेता इलीगल बांधकाम करत असेल तर त्याच्यावर ह्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जातो. कारण असे बांधकाम करण्यासाठी योग्य त्या खात्याची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते. आणि तसे न केल्यास कारवाई होते. प्रत्त्येक धार्मिक स्थळाचे ट्रस्ट असते तर त्यांची परवानगी घेणे गरजेचे असते. देवस्थान च्या अवती भवती असलेली जमीन जर स्वताची असेल तर बंधू शकतो पण जर ती जागा देवस्थान ची किंवा सरकारी असेल तर पूर्व परवानगी घेऊनच काम केले पाहिजे. आणि तसे न केल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते.

६) देशाच्या एकात्मतेला व सार्वभौमत्वाला बाधा उत्पन होईल असे कोणतेही कृत्य करणे करिता

जसे आज आपण सोशियल मिडिया, टी वी वर मोबाईल वर किंवा वृतपत्रांमध्ये बघत असतो कि जाती जाती मध्ये तेड निर्माण केला जातो व त्या मेसेजला फोरवर्ड करून समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जातो. व देशात अ शांतता निर्माण केली जाते. किंवा धार्मिक स्थळांची विटम्बना केली जाते त्यामुळे समाजात अशांतता निर्माण केली जाते. असे कृत्य करणार्यास कायदा १९८८ कलम ३ नुसार दोषी ठरल्यास कारवाई केली जाते.

७) देशाच्या सन्मानास बाधा उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य करणे Act 1988

भारत देशाचे नागरिक म्हणून आपण आपल्या देशाचा मान कसा राखला पाहिजे हे कायद्यामध्ये समजते काही समाज कान्थक देशात अशांतता पसरवीण्यासाठी देशाच्या झेंड्याला किंवा शासकीय इमारतीवर चीकीचे बेनर लाऊन अशांतता निर्माण करण्याचे काम करत असतात जर कोणी अशा प्रकार चे कृत्य करत असेल तर त्याच्या कायदेशीर कारवाई करून समाज हिताचे काम झाले पाहिजे
आजपण आपल्या देशामध्ये असे कृत्य करणार्यांवर वाटेल तशी कडक कारवाही होतांना दिसत नाही. त्याचं मूळ कारण म्हणजे राजकारण ही समजू शकतो कारण असे कृत्य करणार्याला कोणता तरी नेता मदतीला येऊनच जातो. आणि त्यामुळे कायद्याची अंमलबजावनी वाटेल तशी होतांना दिसत नाही. आपल्या भारत देशाच्या सन्मानास बाधा उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

पोलीस पाटलाने आपल्या गावामध्ये कोणत्याही धार्मिक स्थळांचा दुरुपयोग होत असल्यास आपल्या जवडील पोलीस स्टेशन च्या थानेदारास त्याची पूर्व कल्पना दिली पाहिजे

महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा