Ipc kalam IPC Section Marathi
IPC (भारतीय दंड संहिता) कलम काय आहे?
भारतीय दंड संहितेमध्ये संहिताबद्ध केल्याप्रमाणे IPC कलम, गुन्ह्यांसाठी शिक्षा आणि शिक्षेची व्याख्या करणारा कायदेशीर विभाग आहे. हे “कलम” म्हणून ओळखले जाते आणि ते उक्त गुन्ह्याची व्याख्या आणि अपराध्याला शिक्षा देते. कलम क्रमांकासह आयपीसी विभाग वापरला जातो जसे की “कलम 302” किंवा “कलम 376”. या कलमांनुसार, गुन्हेगाराला शिक्षा आणि त्याच्याविरुद्ध शिक्षा निश्चित केली जाते.

Ipc_kalam_marathi
१६१ :सरकारी नोकरी असून सरकारी कामाबद्दल कायद्याने जे मिळावयाचे त्याखेरीज देणगी घेणे ( ३ वर्षे व दंड ) .
१६२ : लाचलुचपतीच्या अगर बेकायदा मार्गांनी सरकारी नोकरांवर वजन पाडणे करीता देणगी देणे .
१६८ : सरकारी नोकराने गैरकायदेशीर व्यापार करणे ( १ वर्ष दंड ) .
१७२ : सरकारी नोकराने केलेले समन्स अगर हुकूम बजाविला जाऊ नये म्हणून फरारी होणे ( १ म . ५०० रु . दंड ) .
१७३ : समन्स अगर दुसरा काही हुकूम बजाविण्यास प्रतिबंध करणे अगर तो जाहीर करण्यास प्रतिबंध करणे . ( १ म . ५०० ) .
१७७ : सरकारी नोकरास जाणूनबुजून खोटी खबर देणे . ( ६ म . १०० ) .
१ ९ १ : खोटी साक्ष देणे . १ ९ २ : खोटा पुरावा देणे .
१ ९ ३ : न्यायाच्या कामात खोटी साक्ष देणे किंवा पुरावा देणे ( ७ वर्षे व दंड ) .
२०२ : अपराधाची खबर देणे कोणा मनुष्यास कायद्याने भाग असून ती देण्याचे त्याने बुद्धिपूर्वक वर्जिणे ( ६ म . व दंड ) . २०३ : केलेल्या अपराधाविषयी खोटी खबर देणे ( २ व दंड ) .
२१२ : अपराध्यास आश्रय देणे .
२६४ : तोलण्याच्या खोट्या साधनांचा उपयोग कपटाने करणे .
२६५ : खोट्या वजनाचा अगर मापाचा उपयोग कपटाने करणे .
२६६ : खोटी मापे अगर वजने जवळ असणे .
२६७ : खोटी मापे अगर वजने करणे अगर विकणे .
२७२ : विक्रीचे पदार्थ अगर पेय पदार्थात भेसळ करून तो खराब करणे .
२७३ : अपायकारक भक्ष्याची अगर पेयाची विक्री करणे .
२७४ : औषधी द्रव्यात भेसळ करणे . २७५ : औषधी द्रव्यात भेसळ करून विक्री करणे .
२७७ : झऱ्यातले अगर हौदातले पाणी गढूळ करणे .
२८ ९ : एखाद्या जनावराविषयी हयगय करणे .
२ ९ ० : सार्वजनिक पीडा करणे .
२ ९ २ : बीभत्स पुस्तकांची विक्री करणे .
२ ९ ३ : तरुण व्यक्तीला बीभत्स वस्तू विकणे .
२ ९ ४ : बीभत्स कृत्ये व गाणी
२ ९ ४ ( अ ) : लॉटरीचे निकाल प्रसिद्ध करणे .
२ ९ ५ : एखाद्या जातीच्या लोकांच्या धर्माचा अपमान करण्याचे इराद्याने भजनाच्या जागेचे नुकसान करणे अगर ती अपवित्र करणे .
२ ९ ५ ( अ ) : कोणत्याही धर्माचा दुष्ट बुद्धीने अपमान करणे .
२ ९ ६ : धर्मकृत्यास जमलेल्या मंडळीस हरकत करणे .
२ ९ ७ : कोणाच्या मनास दुःख द्यावयाचा किंवा धर्माचा अपमान करणे , पूजेच्या जागेवर किंवा स्मशानभूमीवर आगळीक करून जाणे , प्रेतक्रिया करण्यास जमलेल्या मंडळीस हरकत करणे किंवा प्रेताची अप्रतिष्ठा करणे .
२ ९ ८ : धर्म संबंधाने एखाद्या मनुष्याच्या मनास दुःख देण्यास शब्द उच्चारणे .
२ ९९ : सदोष मनुष्य वध.
IPC Section Marathi मध्ये येथून गंभीर गुन्हांची सुरुवात ३०० ते ३१६ पर्यंत दिलेले आहेत
३०० : खून ,
३०१ : ज्याचा जीव घेण्याचा इरादा होता त्याहून निराळ्या मनुष्याचा जीव घेऊन सदोष मनुष्य वधाचा अपराध करणे .
३०२ : खुनाबद्दल शिक्षा ,
३०३ : आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या इसमाने खून केले बद्दल .
३०४ : खून न करता सदोष मनुष्यवध करणे .
३०५ : वेड्यास , खुळ्यास , रोगामुळे बेशुद्ध झालेल्या मुलास , मनुष्यास आत्महत्त्या करणेस साहाय्य करणे .
३०६ : आत्महत्त्या करणेस साह्य करणे .
३०७ : खून करणेचा प्रयत्न करणे .
३१३ : स्त्रीचा संमतीवाचून गर्भपात करणे .
३१५ : मूल जिवंत जन्मू नये , जन्मल्यावर मारण्याचे कृत्य करणे .
३१६ : पोटातील सजीव मुलाचा वध करणे .
३१७ : बारा वर्षांहून कमी वयाच्या मुलाचा त्याग करणे , टाकणे , सोडून देणे .
३१८ : मूल जन्मल्यावर मेले असता गुप्त ठेवणेच्या इराद्याने प्रेत पुरणे व मानवी शरीराविरुद्धचे अपराध ( क . ३१ ९ ते ३२७ ) .
३२८ : विष , मादक पदार्थ , औषधी द्रव्यापासून दुखापत करणे .
३२ ९ : बेकायदा कृत्य करून घेणेस दुखापत करणे .
३३० : जबरदस्तीने कबुलीजबाब घेणेस मालमत्ता परत करण्यास भाग पाडण्यासाठी आपखुशीने दुखापत करणे .
३३२ : सरकारी नोकर सरकारी काम करीत असताना दहशत पाडून त्यास त्याबद्दल कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी आपखुशीने दुखापत करणे .
३३३ : सरकारी नोकरास मोठी दुखापत करणे .
३३७ : जीवितास अगर दुसऱ्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेस धोका पोहोचविणारे कृत्य करून मोठी दुखापत करणे .
३५३ : सरकारी कामात अडथळा करणे .
IPC SECTION MARATHI POLICE PATIL UPYUKT MAHITI
३५४ : स्त्रीचा विनयभंग करणे .
३५५ : कोणा मनुष्याकडून क्रोधास चढण्यास अपमान करणे , अंगावर जाणे , बळजोरी करणे .
३६६ : लग्न करणेस सक्ती करणे , पळवून नेणे .
३७५ , ३७६ : जबरी संभोग , ३७६ ( अ ) : विभक्त होऊन पत्नीशी एखाद्याने संभोग करणे .
३७७ : अनैसर्गिक संभोग .
३७८ : चोरी , ३७ ९ : चोरीबद्दल शिक्षा , ३८० : घरात चोरी करणे .
३ ९ ० : जबरीची चोरी , ३ ९ १ : दरोडा .
३ ९ २ : जबरीच्या चोरीबद्दल शिक्षा .
३ ९ ३ : जबरीची चोरी करण्याचा प्रयत्न करणे .
३ ९ ४ : चोरी करून दुखापत करणे .
३ ९ ५ : दरोड्याबाबत शिक्षा . ३ ९ ६ : खुनासह दरोडा .
३ ९ ७ : जीव घेणे . मोठी दुखापत करणेबद्दल प्रयत्न करून जबरीची चोरी किंवा दरोडा .
३ ९ ८ : शस्त्र बाळगून चोरी अगर दरोडा टाकणे
IPC SECTION MARATHI पोलीस पाटील माहिती
४०५ : विश्वासघात करणे .
४०६ : विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा .
४०७ : सामान परस्पर विकून अन्यायाने विश्वासघात करणे .
४०८ : कारकून किंवा नोकराने अन्यायाने विश्वासघात करणे .
४० ९ : सरकारी नोकराने अपहार करणे . ४१० : चोरीचा माल .
४११ : चोरीचा माल लबाडीने घेणेबद्दल शिक्षा .
४१२ : दरोड्यातील माल लबाडीने घेणे .
४१३ : चोरीच्या मालाचा व्यापार करणे .
४१४ : चोरीचा माल लपविणेच्या कामात मदत करणे .
४२० : फसवणूक . ४२१ : काही माल लबाडीने लपविणे .
४३६ : घरास आग लावणे .
४३७ : नावेला मजला आहे तो नाहीसा करणे .
४३८ : विस्तव किंवा बार उडविण्याबद्दल शिक्षा .
४५४ : कैद शिक्षा आहे तो अपराध करण्यास लपून बसून घर फोडणे .
४५७ : लपून बसून रात्री घरफोडी करणे .
४६३ : बनावट लेख करणे . ४६४ : खोटा दस्तऐवज करणे .
४६५ : बनावट लेख वा शिक्षा .
४६६ : कोर्टाचे कागद , जन्माचे कागद इ . रजिस्टर बनावट करणे . खाडाखोड करणे .
४६७ : दस्तऐवज मृत्युलेख बनावट इ . रजिस्टर बनावट करणे .
४६८ : ठकबाजी करणेस बनावट लेख करणे .
४६ ९ : अब्रू नुकसान करणेस बनावट लेख करणे .
४७० , ४७१ : बनावट लेख खरा म्हणून उपयोग करणे .
४७४ : मृत्युलेख बनावट करून उपयोग करणे .
४८७ : ज्यात जिन्नस आहे अशा बारदानावर खोटी निशाणी करणे .
४८८ : शिक्षा ३ वर्षे . H ४८ ९ अ ब क ड ई – नकली नोटा करून बँकेत खऱ्या म्हणून वापरणे , साहित्य करणे .
४ ९ ३ : पुरुषाने लग्न झाले आहे असे भासवून स्त्री बरोबर रहाणे .
४ ९ ४ : पहिली बायको जिवंत असता पुन्हा विवाह करणे .
४ ९ ५ : विवाहित पुरुषाने लपून दुसरा विवाह करणे .
४ ९ ६ : कायदेशीर विवाह वाचून कपटाने विवाहित होण्याचे ढोंग करणे . ४ ९ ७ : जारकर्म करणे .
४ ९ ८ : विवाहित स्त्रीला फूस लावून नेणे . ४ ९ ८ ( अ ) : स्त्रीला जाच करणे , क्रूर वर्तन करणे .
४ ९९ : अब्रु घेणे .
५०० : अब्रु घेतल्याबद्दल शिक्षा .
५०१ : ज्या गोष्टीने अब्रू जाईल हे माहीत असून गोष्ट छापणे .
५०२ : छापलेले , कोरलेल्या पदार्थात अब्रुघेणारी गोष्ट आहे तो पदार्थ विकणे .
५०३ : धमकी . ५०४ : अपमान , शिवीगाळ ,
५०५ : खोटी अफवा पसरविणे . ५०६ : धमकी देणे .
५०७ : निनावी पत्र पाठवून अन्यायाची धमकी देणे .
५०८ : ईश्वरकोप भासवून केलेले कृत्य .
५० ९ : स्त्रीचा विनयभंग करणे .
५१० : अंमल चढलेल्या मनुष्याने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणू करणे .
५११ : ज्या अपराधास आजन्म कारावास किंवा कैद शिक्ष सांगितली आहे तसे अपराध करण्याचा प्रयत्न करणे .
IPC Section Marathi
अशाप्रकारे, IPC कलमे हे भारतीय दंड संहितेचे पद्धतशीर संदर्भ आहेत, ज्यांचा वापर गुन्हेगारांविरुद्ध योग्यरित्या पडताळलेल्या कारवाईसाठी केला जातो.
The Indian penal code सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करून pdf Download करू शकता. माहिती इंग्रजीत आहे. ipc section marathi लवकरच माहिती पुरवली जाईल
Pingback: घरफोडी होऊ नये म्हणून गावात सभा घेऊन जनजागृती करावी Best 1 to 32 मुद्दे - Police Patil
Pingback: Ek Shetkari Ek DP Yojana 2023 Online Form एक शेतकरी एक डीपी योजना
Pingback: Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 MH I माझी कन्या भाग्यश्री योजना: नवीन दिशेने सामाजिक बदल - पोलीस पाटील