आपल्याकडे चोरी झाल्यास काय करावे | तक्रारी अर्ज कसा करावा Police Complaint form Marathi

By | February 9, 2024
Spread the love

आपल्याकडे चोरी झाल्यास काय करावे | तक्रारी अर्ज कसा करावा Police Complaint Form Marathi मित्रांनो मी तुम्हाला ह्या लेखात, आपल्या गावात चोरी सारख्या घटना सतत होत असतात आणि त्या चोरी संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज Police Complaint Form कसा सदर करावा हे मी तुम्हाला या लेखात सांगणार आहे,

Police Complaint Form

police complaint form

Police Complaint Form पोलीस तक्रार अर्ज

मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस Police Complaint Form अर्ज सादर करणार त्या वेळेस तुम्ही शहरी भागाचे आहात कि, ग्रामीण हे बघून घ्यायचा आहे. कारण पुढील अर्ज हे ग्रामीण भागासाठी लिहून दिलेला आहे. शहरी भागासाठी कसा लिहावा तर त्यात फक्त वरील अधिकार्याचे हुद्दा कोणता त्या नुसार प्रति लिहायचा आहे ग्रामीण भागात सहसा पोलीस सहाय्यक निरीक्षक API लेवेलचे अधिकारी असतात त्यानुसार हुद्दा लिहायचा आहे.

तुमच्याकडे कसली कोणत्या प्रकारची चोरी झालेली आहे. जर त्यात मोबाईल किंवा गाडी यांचा समावेश असेल तर तक्रारी अर्ज दाखल करूनच द्यायचा आहे. कारण मोबाईल किंवा गाडी ह्या वस्तू चुकीच्या कामात वापरले जाऊ शकतात. ते वस्तू चुकीच्या कामात वापरले जाण्यापूर्वी त्याची माहिती आपण स्वतहून पोलिसांना द्यायला पाहिजे. जेणे करून आपल्याला पुढील भविष्यात अडचण होऊ नये म्हणून कारण असे चोरी झालेल्या वस्तूचा गैर वापर होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण आपण बगत आलेलो आहोत कि चुकीच्या कामांमध्ये अशा ज्या चोरीच्या वस्तू असतात त्यांचा वापर विशेस केला जातो त्यामुळे आपण आपल्या सेफ्टीसाठी पोलिसांमध्ये एक तक्रारी अर्ज दाखल केलेला कधीही चांगला.

पोलिसांमध्ये अर्ज कसा दाखल करायचा ह्या बद्दल सविस्तर माहिती पुढे देण्यात आलेली आहे. त्यात काही बदल करून आपण तक्रारी अर्ज दाखल करू शकतो. भविष्यात अडचणी नकोत म्हणून आपण एक अर्ज करून स्वताला भाविशाच्या होणार्या त्रासा पासून वाचवू शकतो

अर्ज कसा लिहायचा याचा नमुना अर्ज पुढील प्रमाणे दिलेला आहे

प्रति
मां. पोलीस अधीक्षक सो
मां. पोलीस आयुक्त सो
मां. पोलीस निरीक्षक सो
मां. सहाय्यक निरीक्षक सो
वरील पैकी जो अधिकारी आपल्या क्षेत्रामध्ये आहे त्याचे नाव वरील प्रमाणे लिहावे. गाव असेल तर गावाचे नाव शहर असेल तर शहराचे नाव असे तालुका जिल्हा व खाली त्या दिवशीचा दिनांक टाकावा.

प्रति
मां. सहाय्यक पोलीस निरीक्षक सो
…………………. पोलीस स्टेशन चे नाव
यांच्या सेवेशी तातुका …… जिल्हा………
दिनांक ………./……./………..

अर्जदार: – अर्जदाराचे नाव, गाव, व मोबाईल नंबर
विषय :- अर्ज करण्याचे कारण लिहायचे आहे

महोदय,
मी वरील विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज सदर करतो कि, मी …..गावाचा रहिवाशी असून (असे लिहित तुम्ही तुमच्या झालेल्या प्रकाराबद्दल कमी शब्दात लिहू शकता.

त्याचं बरोबर त्या वस्तूचा गैर वापर होऊ नये म्हणून मी तक्रारी अर्ज देत असल्याचे नमूद करायचे व नंतर विनंती करत आपला विश्वासू असे लिहून सही करावी व मोबाईल नंबर लिहून द्यायचा ( अर्ज लिहून झाल्यानंतर त्या अर्जाचे एक झेरोक्स काडून घ्यायची ज्यावर त्या दिवसी असलेल्या ठाणे अंमलदाराची सही घ्यायची त्यामुळे तुम्ही अर्ज दिला आहात असे प्रूफ तुमच्या कडे राहील )

टीप :-  चोरी झाल्याची प्रथम माहिती तुमच्या गावाच्या पोलीस पाटीलास द्यावी व त्यांच्या सल्ल्यानुसार Police Complaint Form अर्ज सादर करायचा आहे, जर चोरी गंभीर प्रकारची असेल तर पोलीस पाटील बिट हवालदाराला बोलवून पंचनामा करून धेईल.

वरील लेखामध्ये तुम्हाला काही सुझाव द्यायच्या असल्यास तुम्ही आम्हाला आमच्या Telegram, Whatsapp, Email द्वारे सुझाव देऊ शकतात. लिंक HOME Page दिलेली आहे